प्रशासनाच्या ढिम्म कारभारावर नातेवाईकांकडून प्रचंड संताप
पुणे ; मोशी येथील कचरा डेपोमध्ये ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पाच्या इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेच्या ठिकाणी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ७ कर्मचाऱ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये कार्यरत असणाऱ्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड मोठा ढीग कोसळला. या ठिकानी साधारण 20 कर्मचारी कार्यरत होते, असा अंदाज पालिकेने सांगितला होता. त्यानंतर नऊ कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र इतर कर्मचारी त्या इमारतीच्या स्ट्रक्चर खाली गाडले गेले होते. त्यांना शोधण्यासाठी एनडीआरएफ, लष्कर, अग्निशमन दल आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध यंत्रणांकडून शोधमोहीम राबवली. कचऱ्याचा प्रचंड ढिगारा, विषारी वायू आणि कोसळलेल्या इमारतीचे कठीण काँक्रिट यांचे मोठे आव्हान असतानाही बचाव पथकाने ११ जुलै रोजी मोहीम राबवून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ६ मृतदेहांचा शोध घेण्यात आला.